State News : ऐकलं का… घरगुती छळाच्‍या प्रकरणात पतीच्‍या “प्रेयसी’ला गोवता येणार नाही!

पुणे ः घरगुती छळाच्या प्रकरणात आता प्रेयसीला गोवणे विवाहितांना अवघड जाणार आहे. या कायद्याखाली दाखल झालेल्या पत्नीच्या तक्रारीतून पतीच्या प्रेयसीला वगळण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पुण्याच्या सत्र न्यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे पतीच्या प्रेयसीला प्रतिवादी करता येत नसल्याचे स्पष्ट झाले असून, राज्यभरातील अन्य प्रकरणांवर या आदेशाचा परिणाम …
 
State News : ऐकलं का… घरगुती छळाच्‍या प्रकरणात पतीच्‍या “प्रेयसी’ला गोवता येणार नाही!

पुणे ः घरगुती छळाच्‍या प्रकरणात आता प्रेयसीला गोवणे विवाहितांना अवघड जाणार आहे. या कायद्याखाली दाखल झालेल्या पत्‍नीच्‍या तक्रारीतून पतीच्‍या प्रेयसीला वगळण्याचे महत्त्वपूर्ण आदेश पुण्याच्‍या सत्र न्‍यायालयाने दिले आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. गोसावी यांनी हा निर्णय दिला. या निर्णयामुळे पतीच्या प्रेयसीला प्रतिवादी करता येत नसल्याचे स्‍पष्ट झाले असून, राज्‍यभरातील अन्य प्रकरणांवर या आदेशाचा परिणाम होऊ शकतो.

लग्नानंतर दिव्याला राहुलच्या मोबाइलमधील रेकॉर्डिंगमधून त्याचे लग्नापूर्वीपासूनचे अफेअर कळले होते. वर्षा नावाच्या तरुणीशी त्‍याचे संबंध असल्याचे तिला समजले. राहुलकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने पती, सासू, सासरे आणि पतीच्या प्रेयसीविरोधात तक्रार केली. पोलिसांनी गुन्‍हा दाखल केल्यानंतर न्यायालयासमोर हे प्रकरण आले तेव्‍हा प्रथमवर्ग न्यायालयाने प्रतिवादींना नोटीस बजावली. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यात पतीच्या प्रेयसीविरोधात तक्रार देण्याची तरतूद नाही. त्‍यामुळे वर्षाने अॅड. पुष्कर पाटील आणि अॅड. अनुज मंत्री यांच्यामार्फत सत्र न्यायालयात पुनर्विचार (रिव्हिजन) याचिका दाखल केली.

अॅड. पाटील यांनी वर्षाची बाजू मांडताना, घरगुती छळाच्‍या केसेसमध्ये पतीच्या मित्र- मैत्रिणींना, प्रेयसीला प्रतिवादी करता येत नाही, असे सांगत हायकोर्टाच्‍या निवाड्याचे दाखले दिले. वर्षाचे राहुलशी रक्ताचे किंवा कौटुंबिक नाते नाही. ते एका घरात राहतही नाहीत, राहिलेलेही नाही. कौटुंबिक नातेसंबंधाच्या व्याख्येत वर्षा येत नाही. वर्षा राहुलची प्रेयसी असल्याचा कोणताही पुरावा दिव्याने दिलेला नाही, असे अॅड. पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. त्‍यामुळे तक्रार केवळ सूडबुद्धीने दाखल केली असून, वर्षाला जाणूनबुजून त्रास देण्याचाच उद्देश यामागे आहे, अशी बाजू ॲड. पाटील यांनी मांडली. हा युक्‍तीवाद ग्राह्य धरून न्‍यायालयाने वर्षाला प्रतिवादी करता येणार असल्याचे आदेश दिले.