STATE NEWS तरुणांनो आता तरी डॉक्टरांचं ऐका; स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या खाऊ नका; गर्लफ्रेंड सोबत लॉज वर गेलेल्या तरुणाचा "असा" झाला मृत्यू....
Feb 25, 2025, 10:19 IST
नागपूर (लाइव्ह ग्रुप नेटवर्क): प्रेयसीसोबत रात्र घालवण्यासाठी तो लॉजवर गेला..मात्र त्या तरुणाचा अचानक मृत्यू झाला. नागपूर मधल्या सावनेर मधील हे प्रकरण आहे. दरम्यान पोलिस तपासात, पंचनामा करतेवेळी पोलिसांनी मृतक तरुणाच्या खिशात स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या. तरुणाने प्रेयसीसोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या खाल्ल्या होत्या..
मृतक तरुणाचे नाव अजय परतेकी असून तो अवघ्या २५ वर्षांचा होता. त्याची प्रेयसी २१ वर्षांची असून ती नर्स आहे. अजय त्याच्या प्रेयसीला घेऊन लॉजवर गेला होता. तिथे तो अचानक बेशुद्ध झाल्याने प्रेयसी भांबावली, तिने मित्रांना फोन करून तिथे बोलावले मात्र तोपर्यंत अजयचा मृत्यू झाला होता. दोघांचे ३ वर्षांपासून प्रेमसंबंध होते, दोघे पुढच्या दोन महिन्यांनी लग्न देखील करणार होते. मात्र त्यापूर्वीच ही घटना घडल्याने अजयच्या प्रेयसीला मोठा धक्का बसला आहे..
खिशात सापडल्या स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या...
दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पंचनामा करताना अजयच्या खिशामध्ये स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्या सापडल्या. त्यामुळे लॉजवर गेलेल्या जमिनी स्टॅमिना वाढवणाऱ्या गोळ्यांचे अतिरिक्त सेवन केल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्टॅमिना वाढवणाऱ्या औषधांच्या जाहिरातींना बळी पडू नका असे वारंवार डॉक्टरांकडून सांगितल्या जाते, मात्र तरीही तरुण त्याला बळी पडतात. लैंगिक सुखासाठी अनेकजण डॉक्टरांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय शक्ती वाढवणाऱ्या कोणत्याही गोळ्या व औषधे घेऊ नयेत, त्याचे शरीरावर विपरीत परिणाम होतात. डॉक्टरांनी केलेल्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नये एवढी मात्र नक्की...