

STATE NEWS एकनाथ शिंदे यांनी अमित शहांकडे कुणाची केली तक्रार? काय आहे एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचे कारण! आज रात्री सह्याद्री अतिथगृहावर तातडीची बैठक...
Apr 12, 2025, 20:12 IST
मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आज ,१२ एप्रिलला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवपुण्यतिथीच्या कार्यक्रमात अमित शहा रायगडावर उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील डझनभरमंत्र्यांची उपस्थिती होती. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत रायगडपर्यंत एकत्रित हेलिकॉप्टरमध्ये प्रवास केला.दरम्यान काल रात्रीच एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. या भेटीत त्यांनी अमित शहा यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे.. अर्थ मंत्रालयात फायली लवकर मंजूर होत नाहीत, त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांची अनेक विकास कामे प्रलंबित असल्याची तक्रार एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्याकडे केल्याची चर्चा आहे..दरम्यान या पार्श्वभूमीवर आज मुंबई मुक्कामी अमित शहा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक करणार असल्याचे वृत्त आहे.. विशेष म्हणजे ही बैठक पूर्वनियोजित नव्हती..त्यामुळे शिंदे यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने ही बैठक होत असल्याची चर्चा आहे..
एकनाथ शिंदे यांनी आज शिवतीर्थ रायगडावर हजेरी लावली. श्री रायगड स्मारक मंडळाच्या वतीने आयोजित पुण्यतिथी सोहळ्यासाठी अमित शहा रायगडावर आले होते. दरम्यान कालच महाराष्ट्रात मुक्कामी पोहोचलेल्या अमित शहा यांची एकनाथ शिंदे यांनी रात्रीच भेट घेतली होती. आज देखील अमित शहा, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकाच हेलिकॉप्टरमध्ये रायगडापर्यंत आले होते. रायगडावरील कार्यक्रमानंतर अमित शहा सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आयोजित स्नेहभोजनासाठी गेले होते. सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेल अशी चर्चा होती मात्र या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाल्याची सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले..
दरम्यान आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत अजित पवार उपस्थित राहतात की नाही याबद्दल निश्चित नाही. कारण सुनील तटकरे यांच्या घरी जेवण केल्यानंतर अजित पवार हे साताऱ्याकडे निघाले होते.. आज रात्री अजित पवार परत मुंबईत आल्यास अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची एकत्रित बैठक होईल..मात्र अजित पवार आले नाही तरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत बैठक निश्चित मानला जात आहे.. या बैठकीतच महायुतीतील घडामोडींवर चर्चा होणार असल्याचे कळते...