State News : हायकोर्ट म्हणते, “सख्ख्या भावाने साक्ष दिली म्हणून संशयाने पहावेच असे नाही’

नागपूर : साक्षीदार हा मृत व्यक्तीचा सख्खा भाऊ आहे म्हणून त्याच्याकडे संशयाच्या नजरेतून पहायलाच हवे असे नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील एका खून प्रकरणात न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे. गोपाळ जानराव सरप (३०, रा. चिखलगाव, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. गोपालवर चिखलगाव येथीलच मुकेशची हत्या, …
 
State News : हायकोर्ट म्हणते, “सख्ख्या भावाने साक्ष दिली म्हणून संशयाने पहावेच असे नाही’

नागपूर : साक्षीदार हा मृत व्यक्तीचा सख्खा भाऊ आहे म्हणून त्याच्याकडे संशयाच्या नजरेतून पहायलाच हवे असे नाही, असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

अकोला जिल्ह्यातील चिखलगाव येथील एका खून प्रकरणात न्यायालयाने हा निर्वाळा दिला आहे. गोपाळ जानराव सरप (३०, रा. चिखलगाव, अकोला) असे आरोपीचे नाव आहे. गोपालवर चिखलगाव येथीलच मुकेशची हत्या, मुकेशची आई सुनंदावर प्राणघातक हल्ला व मुकेशच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याचा आरोप आहे.

अकोला सत्र न्यायालयाने गोपाळला तिन्ही गुन्ह्यांत दोषी ठरवले होते. त्यासाठी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. गोपाळने या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मुकेशचे सख्खे भाऊ मनोज आणि सतिशने याप्रकरणी साक्ष दिली होती. सख्ख्या भावाची साक्ष ग्राह्य धरू नका, असा युक्तिवाद गोपालच्या वकिलांनी केला होता. त्यावर उच्च न्यायालयाने ते सख्खे भाऊ आहेत म्हणून त्यांच्या साक्षीकडे संशयाच्या नजरेतून पाहिले जाऊ शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.