State News : सुनेला वश करण्यासाठी पाजले कोंबडीचे रक्‍त!, म्‍हणाला, “नवरा तुला मूल देऊ शकत नसला तरी मी देतो…’

पुणे : सुनेला वश करण्यासाठी अघोरी उपाय म्हणून सासऱ्याने तिला कोंबडीचे रक्त पाजले. तुझा नवरा तुला मूल देऊ शकत नसला तरी मी देतो, असे म्हणत सुनेशी लगट करून विनयभंग केला, अशी तक्रार २४ वर्षीय विवाहितेने पुण्याच्या भोसरी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी दिली. तक्रारीनुसार तिचे लग्न लैंगिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणासोबत लावून दिले. ही बाब तिच्या …
 
State News : सुनेला वश करण्यासाठी पाजले कोंबडीचे रक्‍त!, म्‍हणाला, “नवरा तुला मूल देऊ शकत नसला तरी मी देतो…’

पुणे : सुनेला वश करण्यासाठी अघोरी उपाय म्हणून सासऱ्याने तिला कोंबडीचे रक्त पाजले. तुझा नवरा तुला मूल देऊ शकत नसला तरी मी देतो, असे म्हणत सुनेशी लगट करून विनयभंग केला, अशी तक्रार २४ वर्षीय विवाहितेने पुण्याच्‍या भोसरी पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी दिली.

तक्रारीनुसार तिचे लग्न लैंगिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या तरुणासोबत लावून दिले. ही बाब तिच्या सासू व सासऱ्यांना आधीच माहीत होती. लग्नापूर्वी मुलाचे इंजिनिअरिंग झालेले आहे, असे सांगितले होते. मात्र लग्नानंतर त्याची डिग्री पूर्ण नसल्याचे तिला समजले. तिचा नवरा लैंगिक संबंध ठेवू शकत नव्हता, ही बाब विवाहितेने तिच्या आई- वडिलांना सांगितली म्हणून सासरच्यांनी तिला मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे.

मुलगा लैंगिकदृष्ट्या सक्षम नसल्याने सासऱ्याची सुनेवर नजर फिरली. तिला वश करण्यासाठी त्याने बुवाबाजी, जादूटोणा केला. त्यासाठी सुनेला कोंबडीचे रक्त पाजले. तुझा नवरा तुला मुल देऊ शकत नसला तरी मी देऊ शकतो, असे म्हणत त्याने तिच्‍याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून विवाहितेचा पती,सासरा व सासुविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.