State News : संतापजनक… धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीवर ८ दरोडेखोरांचा सामूहिक लैंगिक अत्‍याचार!

ठाणे : रेल्वेत घुसलेल्या ७ ते ८ दरोडेखोरांनी धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ८ ऑक्टोबरला रात्री लखनौ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर डब्यात घुसले. चाकूचा धाक दाखवून …
 
State News : संतापजनक… धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीवर ८ दरोडेखोरांचा सामूहिक लैंगिक अत्‍याचार!

ठाणे : रेल्वेत घुसलेल्या ७ ते ८ दरोडेखोरांनी धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना ८ ऑक्‍टोबरला रात्री लखनौ – मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये समोर आली आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी दोन संशयितांना अटक केली असून, इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

रात्री आठच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोर डब्यात घुसले. चाकूचा धाक दाखवून त्यांनी १०-१२ प्रवाशांना लुटले. त्यानंतर त्यांची नजर २० वर्षीय तरुणीवर पडली. ८ जणांनी तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. या प्रकारानंतर दरोडेखोरांनी पळ काढला. इगतपुरी ते कसारा रेल्वेस्टेशन दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दरोडा आणि लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. दोन संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा आधार घेऊन पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.