State News : शरद पवार म्‍हणाले, मी बोलण्याएवढ्या पंकजा मोठ्या नेत्या नाहीत!; त्‍यावर पंकजा म्‍हणाल्या, पण तरीही मोठ्यांनी लहानांबद्दल बोललं पाहिजे, त्‍यांना प्रोत्‍साहन दिलं पाहिजेत!

मुंबई ः भाजपा नेत्या, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्यातील समजुतदारपणा आणि उदारपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. शरद पवारांनी त्यांची हेटाळणी केली. पण त्यावरही अगदी संयमी उत्तर देत त्यांनी “मोठे’पण सिद्ध केलं आहे. दसरा गडावर बोलताना पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर देत सरकार पडणार असल्याच्या भूमिकेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष …
 
State News : शरद पवार म्‍हणाले, मी बोलण्याएवढ्या पंकजा मोठ्या नेत्या नाहीत!; त्‍यावर पंकजा म्‍हणाल्या, पण तरीही मोठ्यांनी लहानांबद्दल बोललं पाहिजे, त्‍यांना प्रोत्‍साहन दिलं पाहिजेत!

मुंबई ः भाजपा नेत्या, माजीमंत्री पंकजा मुंडे यांच्‍यातील समजुतदारपणा आणि उदारपणा पुन्‍हा एकदा समोर आला आहे. शरद पवारांनी त्‍यांची हेटाळणी केली. पण त्‍यावरही अगदी संयमी उत्तर देत त्‍यांनी “मोठे’पण सिद्ध केलं आहे.

दसरा गडावर बोलताना पंकजा मुंडे यांनी भाजपाला घरचा आहेर देत सरकार पडणार असल्याच्‍या भूमिकेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले होते. त्‍यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्रतिक्रिया विचारली असता त्‍यांनी मी बोलावे एवढ्या पंकजा मोठ्या नाहीत, असे खोचक टिपण्णी केली होती. त्‍यावर पंकजा मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रिया विशेष चर्चेत आली आहे. त्‍या म्‍हणाल्या, की मी मोठी नेता नाही हे त्यांचे बरोबर आहे. मी लहानच आहे. पण मोठ्यांनी लहानांबद्दल बोललं तर त्यांनाही प्रोत्साहन मिळेल, असे पंकजा म्‍हणाल्या.

दसरा मेळाव्यातील आवाहनाबद्दल विचारले असता पंकजा म्‍हणाल्या, की सत्तांतर होणार ही भावना कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करून काहीच उपयोग नाही. उलट या भावनेत ते राहून शिथील राहतात. आता आपण सक्षमपणे काम करण्याची गरज आहे. आक्रमकपणे राज्‍य सरकारमधील उणिवा समोर आणल्या पाहिजेत. सरकार राहते की जाते हा विचार सध्या तरी महत्त्वाचा नाही, असे पंकजा म्‍हणाल्या.