धक्‍कादायक… भानामतीच्‍या संशयावरून कुटुंबाला खांबाला बांधून ग्रामस्‍थांची बेदम मारहाण!

चंद्रपूर ः अंधश्रद्धा अजूनही समाजात घट्ट आहे. कितीही प्रयत्न केले, जागृती केली तर अंधश्रद्धेच्या विळख्यातून समाजाची सुटका करणे अशक्य असल्याचेच चंद्रपूर जिल्ह्यातील एका घटनेवरून समोर आले आहे. भानामती करत असल्याच्या संशयावरून वणी खुर्द (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथील एका कुटुंबाला ग्रामस्थांनी खांबांना बांधले आणि बेदम मारहाण केली. चार महिला व तीन पुरुष या मारहाणीत गंभीर …
 
धक्‍कादायक… भानामतीच्‍या संशयावरून कुटुंबाला खांबाला बांधून ग्रामस्‍थांची बेदम मारहाण!

चंद्रपूर ः अंधश्रद्धा अजूनही समाजात घट्ट आहे. कितीही प्रयत्‍न केले, जागृती केली तर अंधश्रद्धेच्‍या विळख्यातून समाजाची सुटका करणे अशक्‍य असल्याचेच चंद्रपूर जिल्ह्यातील एका घटनेवरून समोर आले आहे. भानामती करत असल्याच्‍या संशयावरून वणी खुर्द (ता. जिवती, जि. चंद्रपूर) येथील एका कुटुंबाला ग्रामस्‍थांनी खांबांना बांधले आणि बेदम मारहाण केली. चार महिला व तीन पुरुष या मारहाणीत गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी ग्रामस्‍थांविरुद्ध गुन्‍हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

वणी खुर्द हे गाव तेलंगणा- महाराष्ट्र सीमेवर आहे. सूत्रांनी सांगितले, की काही दिवसांपूर्वी गावातील दोन- तीन महिलांच्या अंगात देवी आली. त्‍यांनी या कुटुंबातील व्‍यक्‍तीच गावावर भानामती करत असल्याचे ग्रामस्‍थांनी सांगितले होते. थेट देवीनेच सांगितल्याने ग्रामस्‍थांनी थोडाही विचार न करता या कुटुंबातील सातही जणांना गावातील चौकात आणले. खांबांना त्‍यांचे हातपाय बांधून बेदम मारहाण केली. पोलिसांना कुणीतरी या घटनेची माहिती दिली. त्‍यामुळे पोलीस तातडीने गावात आले. त्‍यांनी सातही जणांची सुटका करून जिल्हा रुग्‍णालयात दाखल केले. पाच जणांची प्रकृती गंभीर आहे.