State News : खासदारपुत्राचा तरुणीवर लैंगिक अत्‍याचार!; आधी लग्‍नाचे आमिष, नंतर म्‍हणे “तू ठेवलेली बाई!’

वर्धा ः लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे प्रकरण वर्ध्यात समोर आले आहे. विशेष म्हणजे आरोपी हायप्रोफाईल असून, चक्क खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज आहे. पीडित तरुणीने थेट नागपूरमध्ये विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे तक्रार केली होती. त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्थानिक पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बनावट …
 
State News : खासदारपुत्राचा तरुणीवर लैंगिक अत्‍याचार!; आधी लग्‍नाचे आमिष, नंतर म्‍हणे “तू ठेवलेली बाई!’

वर्धा ः लग्‍नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्‍याचार करण्यात आल्याचे प्रकरण वर्ध्यात समोर आले आहे. विशेष म्‍हणजे आरोपी हायप्रोफाईल असून, चक्‍क खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज आहे. पीडित तरुणीने थेट नागपूरमध्ये विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे तक्रार केली होती. त्‍यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर स्‍थानिक पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केली. कोऱ्या कागदावर सह्या घेऊन बनावट लग्‍नाचे चित्रही उभं करण्यात आलं होतं. मात्र फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पीडितेने जेव्‍हा “खरंखुरं’ लग्‍न लावण्याचा तगादा लावला तेव्‍हा खासदार पुत्राने तिला तू ठेवलेली बाई अाहेस, असे म्‍हणून शिविगाळ करत मारहाण केली, असा आरोप पीडितेने केला आहे.

सूत्रांच्‍या माहितीनुसार, खासदारपूत्र पंकजचे वर्ध्यातील तरुणीसोबत प्रेम जुळले. भेटीगाठी वाढल्या. यातून त्‍याने लग्‍नाचे वचनही तिला दिले. यातून त्‍याने तिचे लैंगिक शोषण सुरू केले. दुसरीकडे लग्‍नाबद्दल मात्र त्‍याच्‍या काेणत्याच हालचाली होत नव्हत्या. तरुणीने याबाबत वारंवार विचारणा केली तेव्हा त्‍याने बनावट विवाहाचं चित्र उभं केलं. शिव वैदिक विवाह संस्‍थेचं कोरं प्रमाणपत्र आणून त्‍यावर तरुणीच्या सह्या घेतल्या. आणखी काही कोऱ्या कागदांवरही सह्या घेतल्या. त्‍यानंतर लग्‍न झाल्याचं त्‍यानं तरुणीला सांगितलं.

मात्र तरुणीला विश्वास पटला नाही. अशा पद्धतीने लग्‍न लागत नसतं, हे तिला माहीत असल्याने तिने रितसर लग्‍न केल्याशिवाय सोबत राहणार नाही, असे सांगितले. मात्र त्‍यानंतरही त्‍याने लग्‍नाचे आमिष दाखवत सोबत राहायला तिला भाग पाडले, अशी तक्रार पीडितेने केली आहे. मात्र त्‍यानंतर काहीच दिवसांत त्‍याचे मन भरले. तो तिला शिविगाळ करू लागला, मारझोड करू लागला. तू ठेवलेली बाई आहे. सांगेल तसं राहायचं, वागायचं असं म्‍हणून तो तिला धमकावू लागला. लग्‍न न करताच होणाऱ्या त्रासाला कंटाळून तिने विशेष पोलीस महानिरिक्षकांकडे तक्रार केली. त्‍यानंतर पोलिसांनी हे प्रकरण कौटुंबिक न्यायालयात दाखल केलं आहे. या प्रकरणात पुरते फसले गेल्याची जाणीव झाल्यानंतर आता पंकजने बचावात्‍मक पवित्रा घेतला असून, ६ ऑक्‍टोबर २०२० रोजी आम्‍ही लग्‍न केल्याचा दावा करत दोघांत वितुष्ट आल्याचे सांगण्यात आले आहे. त्‍यामुळेच हे प्रकरण आता कौटंुबिक न्यायालयात दाखल आहे.