State News : आ. भास्‍कर जाधव म्‍हणतात… तर मोदींचे अस्तित्व तेव्हाच संपलं असतं!

रत्नागिरी : गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या मागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले म्हणून बरे अन्यथा तेव्हाच त्यांचे अस्तित्व संपले असते, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी भाजपावर टीका केली आहे. ईडी, एनसीबी, सीबीआय या यंत्रणांचा दुरुपयोग करून केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत आहे, असेही जाधव म्हणाले. पत्रकारांशी बोलताना भास्कर जाधव म्हणाले, की शिवसेना …
 
State News : आ. भास्‍कर जाधव म्‍हणतात… तर मोदींचे अस्तित्व तेव्हाच संपलं असतं!

रत्नागिरी : गुजरातचे तत्‍कालिन मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांच्या मागे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे उभे राहिले म्‍हणून बरे अन्यथा तेव्‍हाच त्‍यांचे अस्तित्व संपले असते, अशा शब्‍दांत आमदार भास्‍कर जाधव यांनी भाजपावर टीका केली आहे. ईडी, एनसीबी, सीबीआय या यंत्रणांचा दुरुपयोग करून केंद्र सरकार सुडबुद्धीने वागत आहे, असेही जाधव म्‍हणाले.

पत्रकारांशी बोलताना भास्‍कर जाधव म्‍हणाले, की शिवसेना कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांची सतर्कता आणि कल्पकतेमुळे भाजप स्वतःच खड्ड्यात गेली आहे. भाजपाकडून शिवसेनेला खालच्या पातळीवर टार्गेट केले जात आहे. मुंबई महानगरपालिकेतून मराठी माणसाला बाहेर काढण्याचा डाव आहे, असे जाधव म्‍हणाले. ८६ तासांचं राष्ट्रवादीसोबत सरकार कोणी बनवलं? भाजपनेच ना? मग कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपला? तीन पायाचं सरकार म्‍हणता पण भाजपसोबत आज जे घटक आहेत त्यांनी भाजपचं हिंदुत्व स्वीकारलं आहे का?, असा प्रश्नही जाधव यांनी विचारला.