State Crime : चिमुकल्याच्‍या गुप्‍तांगाला चटके देऊन अमानुष अत्‍याचार, नाशिक जिल्ह्यातील सावत्र आईचा प्रताप

नाशिक (नाशिक लाइव्ह वृत्तसेवा)ः माय मरो नि मावशी जगो असं म्हटलं जातं खरं पण कलियुगात या नात्याचा अर्थच काही विकृतींनी बदलला आहे. सावत्र आई असलेल्या मावशीने 3 वर्षीय मूकबधित चिमुकल्याच्या गुप्तांगावर चटके देत अमानुष अत्याचार केले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पाडे येथे समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. …
 

नाशिक (नाशिक लाइव्‍ह वृत्तसेवा)ः माय मरो नि मावशी जगो असं म्‍हटलं जातं खरं पण कलियुगात या नात्‍याचा अर्थच काही विकृतींनी बदलला आहे. सावत्र आई असलेल्या मावशीने 3 वर्षीय मूकबधित चिमुकल्याच्‍या गुप्‍तांगावर चटके देत अमानुष अत्‍याचार केले. ही घटना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्‍यातील पाडे येथे समोर आली आहे. घटनेचा व्हिडिओ व्‍हायरल झाल्याने संतापाची लाट उसळली आहे.

सध्या चिमुकल्यावर नाशिकच्‍या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बालकाच्या अंगावर अनेक ठिकाणी चटके दिले आहेत. हा प्रकार शेजाऱ्यांना कळल्यानंतर त्‍यांनी चिमुकल्याला दिंडोरी येथे उपचारासाठी नेले, तेथून जिल्हा रुग्णालयात त्‍याला हलविण्यात आले. कौटुंबिक कलहातून सोडून गेलेल्या आईनंतर मावशीच त्‍याची सावत्र आई झाली होती. पण मावशीच्या नात्‍याला या सावत्र आईने काळीमा फासला आहे. घटनेचा तपास दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनंत तारगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेशकुमार चव्हाण करत आहेत. दुसरीकडे मुलाला चटके दिल्याचा आरोप सावत्र आईने फेटाळला असून, चिमुकला आणि त्याच्या मोठ्या भावात भांडण होऊन त्‍यातून ही घटना घडल्‍याचा तिचा आरोप आहे.