State Crime News : रेखा जरेची हत्‍या प्रेमसंबंधातून!

अहमदनगर (नगर लाइव्ह वृत्तसेवा) ः 3 वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध, त्यात सुरू असलेले वाद आणि वादावादीतून बदनामीच्या भीतीपोटी थेट प्रेयसीला सुपारी देऊन यमसदनी पाठल्याचा प्रकार… यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडाचे हे कारण न्यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात अहमदनगर पोलिसांनी दिले आहे. मुख्य आरोपी बाळ बोठे याच्यासह सहा जणांविरुद्ध हे दोषारोपत्रपत्र आहे. त्यांना काल, 8 …
 

अहमदनगर (नगर लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 3 वर्षांपासून असलेले प्रेमसंबंध, त्‍यात सुरू असलेले वाद आणि वादावादीतून बदनामीच्‍या भीतीपोटी थेट प्रेयसीला सुपारी देऊन यमसदनी पाठल्याचा प्रकार… यशस्विनी महिला ब्रिगेडच्‍या अध्यक्षा रेखा जरे यांच्‍या हत्‍याकांडाचे हे कारण न्‍यायालयात सादर केलेल्या दोषारोपपत्रात अहमदनगर पोलिसांनी दिले आहे. मुख्य आरोपी बाळ बोठे याच्‍यासह सहा जणांविरुद्ध हे दोषारोपत्रपत्र आहे. त्‍यांना काल, 8 जूनला पारनेर न्‍यायालयात हजर करण्यात आले.

30 नोव्‍हेंबर 2020 रोजी नगर- पुणे महामार्गावरील जातेगाव घाटात जरे यांचा खून करण्यात आला होता. खुनाचा सूत्रधार बाळ बोठे याला घटनेच्‍या तीन महिन्यांनी हैदराबादेतून अटक करण्यात आली होती. त्‍याला मदत करणाऱ्या सहा जणांनाही अटक करण्यात आली होती. या सर्वांविरुद्ध साडेचारशे पानांचे दोषारोपपत्र न्‍यायालयात सादर केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांनी पत्रकारांना दिली.

जरे यांच्‍या हत्‍येसाठी प्रियकर बाळ बोठे याने बारा लाख रुपयांची सुपारी दिली होती. बोठे आणि जरे 2017 मध्ये एकमेकांच्‍या संपर्कात आले होते. त्‍यानंतर त्‍यांच्‍यात प्रेमसंबंध जुळले. मात्र याच संबंधातून एकमेकांवर संशय घेऊन लागल्याने त्‍यांच्‍यात वाद होत होते. या वादातून बदनामीची भीती बोठेला होती. हत्‍येच्‍या दिवशीही बोठे हा जरे यांच्‍या संपर्कात होता. हत्‍येनंतर अर्ध्या तासातच बोठेने सुपारीचे पैसे सागर भिंगारदिवे याला दिले होते. नंतर सामान्य रुग्‍णालयात जरे यांचा मृतदेह पाहण्यासाठीही बोठे आला होता. मारेकरी पकडल्‍यानंतर मात्र तो पसार झाला.