दिलासा.... नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गॅसच्या किंमतीत घट! "इतक्या" रुपयांना मिळणार सिलेंडर..

 

 मुंबई(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): एकीकडे सर्वसामान्यांना महागाईच्या चटक्यांनी हैराण केलेले असताना आज १ एप्रिलला नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी थोडाफार दिलासा मिळाला आहे. मात्र हा दिलासा सर्वसामान्यांना नसून गॅस सिलेंडरचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांना आहे.. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत आजपासून ४१ रुपयांची घट झाली आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर च्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.. एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

  तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी केले आहेत. आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत ४१ रुपयांनी कमी झाली असून हे सिलेंडर आता १७६२ रुपयांना मिळणार आहे. एलपीजी गॅस च्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी ठरवल्या जातात, त्यानुसार आज व्यावसायिक गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत.
घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात मात्र कोणततेही बदल नाहीत. १४.२ किलोचा घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर दिल्लीत ८०३, मुंबईत ८०२ रुपयांना मिळत आहे...