

झटका! सर्वसामान्यांना खिशाला कात्री! घरगुती वापराचा गॅस सिलेंडर सिलेंडर ५० रुपयांनी महागला! व्यासायिक गॅस सिलेंडर स्वस्त....
Apr 8, 2025, 09:00 IST
बुलडाणा ( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): केंद्र सरकारने घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ ८ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असून यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला चांगलाच फटका बसणार आहे.
केंद्रीय पेट्रोलियम आणि प्राकृतिक गॅस मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी याबाबत माहिती काल ७ एप्रिल रोजी दिली. दरम्यान याआधी व्यावसायिक वापराच्या सिलेंडरच्या किंमती मात्र कमी करण्यात आल्या आहेत, त्यामुळे व्यावसायिक वापर करणाऱ्यांना मात्र फायदा होणार आहे..
उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १४.२ किलो गॅस सिलेंडरची किंमत ५०० रुपयांवरून आता ५५० रुपये झाली आहे. तर सर्वसामान्य ग्राहकांसाठी ही किंमत ८०३ रुपयांवरून थेट ८५३ रुपये इतकी झाली आहे. या निर्णयामुळे अनेक घरांच्या मासिक बजेटवर परिणाम होणार असून सामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.