अंगाची होणार लाहीलाही! मार्च ते मे दरम्यान घाम फोडणारे ऊन; सूर्य आग ओकणार! हवामान विभागाचा अंदाज...
Mar 1, 2025, 14:27 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): फेब्रुवारी महिना नुकताच संपला आहे. मात्र असे असले तरी उन्हाच्या झळा प्रचंड जाणवू लागल्या आहेत.यंदाच्या उन्हाळ्यात सूर्य चांगलीच आग ओकणार असून यंदा घामाघूम करणारे ऊन पडणार आहे. तसा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे..
यंदा देशभरातच मार्च ते मे दरम्यान दरवर्षीपेक्षा अधिक तापमान असणार आहे. उष्णतेची लाट यंदा अतिशय तीव्र होणार असल्याचा अंदाज आहे. बुलडाणा जिल्ह्यात खामगाव मध्ये आताच प्रचंड उकाडा जाणवू लागला आहे. यावर्षी गेल्यावर्षीपेक्षा अधिक तापमान राहणार असल्याचा अंदाज सर्वच हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यातील अंतर्गत भागात २ ते ३ अंश सेल्सिअस ने तापमान वाढणार आहे.