शेतकऱ्यांनो, वेळ गमावू नका! "फार्मर आयडी नसेल तर शासनाच्या योजना मिळणार नाहीत; तात्काळ नोंदणी करा – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन"

 
 बुलढाणा ( बुलडाणा लाईव्ह वृत्तसेवा): राज्य आणि केंद्र सरकारच्या शेतकरी कल्याण योजनांचा लाभ घेण्यासाठी आता फार्मर आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) अनिवार्य करण्यात आला आहे.
ज्यांच्याकडे फार्मर आयडी नसेल, त्यांना पीएम किसान, पीक विमा, पीक कर्ज आणि इतर सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
फार्मर आयडी म्हणजे काय?
फार्मर आयडी हा तुमचा शेतकरी म्हणून ओळख पटवणारा सरकारी क्रमांक आहे. यामध्ये तुमचा आधार आणि सातबारा (७/१२) दस्त नोंदवला जातो. एकदा आयडी झाल्यानंतर पुढील योजनांसाठी बारंवार कागदपत्रांची गरज भासत नाही.
कोठे करायची नोंदणी?
  तुमच्या गावाजवळच्या CSC (नागरी सुविधा केंद्र) किंवा सरकारच्या शिबिरांमध्ये फार्मर आयडीची नोंदणी करता येते. प्रक्रिया अगदी सोपी आहे.
बुलडाणा जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ५८ हजार ६७४ शेतकऱ्यांचे फार्मर आयडी तयार झाले आहेत.
पण अजूनही १ लाख ५६ हजारांहून अधिक शेतकरी आयडीपासून वंचित आहेत.
पीएम किसान योजनेच्या लाभासाठीही फार्मर आयडी आवश्यक आहे.
लाभ मिळणार नाही..
जर फार्मर आयडी तयार केला नाही, तर पुढील काळात शासनाच्या कोणत्याही कृषी योजनांचा लाभ मिळणार नाही.
त्यामुळे वेळ न गमावता आजच फार्मर आयडी तयार करून सरकारी योजनांचा लाभ मिळवा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांनी केले आहे..