

EXCLUSIVE अरेच्चा ..! हे काय नवीन? बुलडाणा जिल्ह्यातील "या" गावात नवा आजार! तीन दिवसांतच पडत आहे नागरिकांचे टक्कल.....
Jan 8, 2025, 08:15 IST
शेगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तीन वर्षाआधी जगभरात कोरोना व्हायरसची चर्चा झाली..आता पुन्हा एकदा चीन मधून HMVP या नव्या आजाराचे संक्रमण सुरू झालेले असतानाच बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातून एक अजब आजार समोर आला आहे.. शेगाव तालुक्यातील तीन गावांमध्ये एका अज्ञात आजाराचे संक्रमण होत आहे.या आजारात तीन दिवसातच नागरिकांचे टक्कल पडत आहे, त्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे..
शेगाव तालुक्यातील बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील काही नागरिकांना अज्ञात आजाराची लागण झाली आहे. केस गळतीच्या या आजाराने थैमान घातले आहे. आधी डोके खाजवणे, नंतर केस गळणे आणि तिसऱ्या दिवशी टक्कल पडणे असे या आजाराचे स्वरूप असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसात शेकडो गावकऱ्यांची केस गळती झाली आहे. विशेष म्हणजे महिलांची देखील मोठ्या प्रमाणात केस गळती होऊ लागली आहे.
आरोग्य विभागाने लक्ष देण्याची गरज...
गावकऱ्यांनी हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर आरोग्य प्रशासन देखील जागी झाली आहे. आरोग्य पथकाकडून सर्वेक्षण देखील करण्यात आले आहे. मात्र आजाराची लागण का झाली ? याचे मुळ कारण अद्याप समोर आलेले नाही. पाणी किंवा शाम्पू यामुळे हा आजार होऊ शकतो असे काही त्वचा विकार तज्ञांचे म्हणणे आहे. गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत...