चॅट जीपीटीच्या ghibli फिचरची जिल्ह्यातील नेत्यांना भुरळ; केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव,आ.डॉ.कुटे, राहुल बोंद्रे, जयश्रीताईंनी शेअर केले ghibli स्टाईल फोटो;

 तुम्हाला व्हायचंय ट्रेंडमध्ये सहभागी? मग "हे" करा..
 
 बुलडाणा(अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सोशल मीडियावर कधी काय ट्रेंडिंग ला जाईल याचा नेम नसतो..आता सध्या जगभरातील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चॅट जीपीटीच्या ghibli फिचरची हवा आहे. ओएनआयच्या चॅट जीपीटीने वापरकर्त्यांसाठी आता नवी इमेज जनरेटर सेवा सुरू केली आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या ट्रेंड मध्ये सहभागी होण्याचा मोह आवरता आलेला नाही.कालपासून सुरू करण्यात झालेला हा ट्रेड आता बुलढाणा जिल्ह्यातही पोहोचला असून बुलढाणा जिल्ह्यातील नेते देखील या नव्या फीचरच्या प्रेमात पडले आहेत..केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव देखील या नव्या फीचरच्या प्रेमात पडले आहेत, त्यांनीदेखील त्यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा एक फोटो ghibli स्टाईल अपलोड केला आहे.

   चॅट जीपीटीच्या या नव्या फीचर्स मुळे युजर्स मोठ्या प्रमाणात Ghibli शैलीतील एआय जनरेटेड फोटो तयार करत आहेत.. राजकीय नेते, बॉलीवूड अभिनेते देखील यात मागे नाहीत. बुलढाणा जिल्ह्यातील नेत्यांना देखील याची भुरळ पडली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे यांच्यासोबत चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आ.डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा एक खास फोटो शेअर केला आहे. जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी पत्नी ॲड. वृषाली बोंद्रे यांच्यासोबत चा फोटो शेअर केला आहे तर उबाठा नेत्या जयश्रीताई शेळके यांनी त्यांचे पती सुनील शेळके यांच्यासोबत फोटो टाकून ट्रेंडमध्ये सहभाग घेतला आहे.. व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा सपकाळ यांनीदेखील या नव्या फीचरच्या मदतीने फोटो बनवून सोशल मीडियावर शेअर केला आहे..

कशी तयार करणार घिबली इमेज?

हे नवे फिचर चॅटजीपीटीने आपले संकेतस्थळ व ॲपवर मोफत युजर्ससाठी मर्यादित स्वरूपात तर सबस्क्रिप्शन घेतलेल्या सदस्यांसाठी अमर्यादित स्वरूपात वापरासाठी उपलब्ध केले आहे. हे फिचर वापरण्यासाठी चॅटजीपीटीचे संकेतस्थळ किंवा ॲपवर
छायाचित्र अपलोड करावे लागते. या फोटोसोबत Turn this into a Ghibli style portrait?, Show me in Studio Ghibli style, Make a Studio Ghibli version of this image असे निर्देश देणारा मजकूर म्हणजेच प्रॉम्प्ट टाईप करावा लागतो.