BIG NEWS मुंबईच्या वेशीवर शेतकरी–पोलिसांचा संघर्ष सुरू... सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी! पोलिसांचा बळाचा वापर.. . रविकांत तुपकरांना अटक

 
मुंबई(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुंबईतील नरिमन पॉईंट येथे अरबी समुद्रात सातबारा बुडवण्याच्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आज, १९ मार्चला हे आंदोलन होणार आहे..कालपासूनच पोलिसांनी हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. तुपकर यांच्या प्रमुख शिलेदारांना कालपासूनच बुलडाणा पोलिसांनी ताब्यात घेऊन ठेवले.मात्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून इतर शेतकरी ठरल्याप्रमाणे मुंबईच्या वेशीवरील नढाळ गावात मुक्कामी पोहोचले. रविकांत तुपकर परवा रात्रीपासूनच भूमिगत होते, पोलिसांची दहाच्या वर पथके तुपकर यांच्या मागावर होती.मात्र पोलिसांना चुकांडा देऊन रविकांत तुपकर आज सकाळी नढाळ गावात पोहोचले. दरम्यान रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करून मुंबईकडे अधिकच करण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी रविकांत तुपकर यांना अटक केली आहे.इतर शेतकऱ्यांना मुक्कामाच्या स्थळीच कोंडले आहे.आता नढाळ गावातच शेतकऱ्यांचा पोलिसांशी संघर्ष सुरू झाला आहे..
 तुपकर
शेतकऱ्यांचा मुक्काम रायगड जिल्ह्यातील मुंबईच्या वेशीवर असलेल्या नढाळ गावातील श्री क्षेत्र पंचायतन मंदिर येथे होता. मुक्काम परिसराच्या चहुबाजूनी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावून ठेवला. त्यामुळे परिसराच्या गेटवरच पोलीस आणि शेतकऱ्यांमधला संघर्ष आता सुरु झाला आहे.. आंदोलन मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याने आंदोलन पेटले आले.. रविकांत तुपकर यांना पोलीस नेमके कुठे घेऊन गेले याबद्दल अद्याप माहिती नाही..