BIG NEWS केंद्रीय निवडणूक आयोगाची आज दुपारी पत्रकार परिषद! महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा?
Oct 15, 2024, 09:53 IST
नवी दिल्ली(लाइव्ह ग्रुप नेटवर्क): केंद्रीय निवडणूक आयोगाने आज,१५ ऑक्टोबरच्या दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद बोलावली आहे. याच पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे..त्यामुळे आज दुपारपासून राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते..
महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाल २६ नोव्हेंबरला संपणार आहे तर झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी रोजी संपणार आहे. त्या आधी निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण होणे अपेक्षित असल्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची तयारी सुरू आहे.
आज दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली असून याच पत्रकार परिषदेत निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होऊ शकतो.. महाराष्ट्र आणि झारखंड व्यतिरिक्त देशभरातील ५० जागांवरील पोटनिवडणुकीचा कार्यक्रम देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज जाहीर होण्याची शक्यता आहे.