मोठी बातमी! निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली; खा.मुकुल वासनिकांकडे राज्यपातळीवर मोठी जबाबदारी; विदर्भाची जबाबदारी दोन माजी मुख्यमंत्र्यांवर...

 
 बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) लोकसभा निवडणुकीत मिळालेला जनाधार पाहता विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसही अधिक सजगपणे समोर जात आहे. महाविकास आघाडीला विदर्भाकडून मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे काँग्रेसने निरीक्षक पदाची जबाबदारी विदर्भासाठी दोन माजी मुख्यमंत्र्यांवर सोपवली आहे. शिवाय खा. मुकुल वासनिक यांच्यावर राज्य पातळीवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे..

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकासाठी विभागनिहाय वरिष्ठ निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. मुंबई व कोकण विभागासाठी राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत व डॉ. जी. परमेश्वर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विदर्भासाठी छत्तिसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उमंग सिंघर यांची नियुक्ती केली आहे.

मराठवाड्यासाठी राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट व तेलंगाणाचे मंत्री उत्तमकुमार रेड्डी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रासाठी टी. एस. सिंगदेव व एम. बी. पाटील तर उत्तर महाराष्ट्रासाठी डॉ. सय्यद नासीर हुसेन व डी. अनसुया सिथक्का यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकूल वासनिक व अविनाश पांडे हे या निवडणुकीसाठी वरिष्ठ समन्वयक असतील असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने जाहीर केले आहे. मुकुल वासनिक यांच्या नियुक्तीमुळे बुलडाणा जिल्ह्यातील काँग्रेसजनांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे...