

समृद्धीवर अपघात! सिने अभिनेता सोनू सुदची पत्नी सोनाली सुद जखमी....
Mar 25, 2025, 15:43 IST
मुंबई(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर अपघाताचे सत्र काही थांबत नाही. आता आणखी एक अपघाताची बातमी समोर आली आहे . त्यात सिने अभिनेता सोनू सुदची पत्नी सोनाली सुद जखमी झाली आहे.. नागपूर जवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. सोनाली वर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
हिंदुस्तान टाइम्स ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. वृत्तानुसार आज,२५ मार्चच्या पहाटे हा अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही..
सोनालीच्या कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी या अपघाताची पुष्टी केली आहे. सोनाली बहीण आणि तिच्या मुलासोबत प्रवास करीत होती. अपघातात सोनाली आणि तिच्या बहिणीचा मुलगा जखमी झाला आहे. सोनालीची बहीण या अपघातात किरकोळ जखमी झाली आहे.