हॉटेलमधील बाथरूममध्ये मोबाइल कॅमेर्‍याने महिलांचे चित्रिकरण

पुणे ः महिलांच्या बाथरूमध्ये मोबाइल कॅमेर्याद्वारे वेटरकडून चित्रीकरण केले जात होते. हा धक्कादायक प्रकार मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील पाषाणच्या एका हॉटेलमध्ये समोर आला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी हाफिज अन्सारी (18) या कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी आणि कुटुंबीय दोन या हॉटेलमध्ये गेले होते. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी बाथरूमध्ये गेली होती. त्यावेळी अन्सारी तेथे …
 

पुणे ः महिलांच्या बाथरूमध्ये मोबाइल कॅमेर्‍याद्वारे वेटरकडून चित्रीकरण केले जात होते. हा धक्कादायक प्रकार मुंबई-बंगळुरू बाह्यवळण महामार्गावरील पाषाणच्या एका हॉटेलमध्ये समोर आला आहे. चतुःश्रृंगी पोलिसांनी हाफिज अन्सारी (18) या कामगाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणी आणि कुटुंबीय दोन या हॉटेलमध्ये गेले होते. रात्री नऊच्या सुमारास ही तरुणी बाथरूमध्ये गेली होती. त्यावेळी अन्सारी तेथे घुटमळत असल्याचे निदर्शनास आले. तो मोबाइल कॅमेर्‍याद्वारे चित्रीकरण करत असल्याचे तिला दिसले. तिने त्याला जाब विचारला. त्यावेळी तो तिला ढकलून पसार झाला.