हिंदू तरुणी मुस्लिम प्रियकराला निकाह मांडवातून घेऊन झाली पसार!

लखनऊ ः एका मुस्लिम प्रियकरासोबत लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये एक हिंदू तरुणी राहत होती. हे दोघेही सज्ञान आहेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं; परंतु मुस्लिम तरुणाचा दुसऱ्याच मुलीशी होत असलेला निकाह तिला समजला. तिनं प्रियकराचा निकाह थांबवून त्याच्यासोबत फरार झाली. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनोरमधील आहे. संतोष कुमारी मंडवर हे या तरुणीचं नाव. अजमल अहमद हा तिचा …
 

लखनऊ ः एका मुस्लिम प्रियकरासोबत लीव्ह इन रिलेशनशीपमध्ये एक हिंदू तरुणी राहत होती. हे दोघेही सज्ञान आहेत. त्यांचं एकमेकांवर प्रेम होतं; परंतु मुस्लिम तरुणाचा दुसऱ्याच मुलीशी होत असलेला निकाह तिला समजला. तिनं प्रियकराचा निकाह थांबवून त्याच्यासोबत फरार झाली. ही घटना उत्तर प्रदेशातील बिजनोरमधील आहे.

संतोष कुमारी मंडवर हे या तरुणीचं नाव. अजमल अहमद हा तिचा प्रियकर. त्याचा शोध घेण्यासाठी ती मित्रांसोबत आली. तिची हेअरड्रेसर असणाऱ्या अजमलशी सलूनमध्ये भेट झाली. दोघांत प्रेम झालं. ते लीव्ह-इनमध्ये राहायला लागले. काही दिवसांपूर्वी दिल्लीतून अजमल त्याच्या मूळ गावी आला. त्याचं एका दुसऱ्या मुलीसोबत लग्न होणार होतं. ही माहिती मिळताच संतोष कुमारीनं थेट बिजनोर गाठलं.

अजमलला दिल्लीला घेऊन जाण्यासाठी तिनं पोलिसांची मदत घेतली. अजमलच्या निकाह मंडपात संतोष कुमारी एकटीच गेली नाही. तिनं पोलिसांनाही बरोबर नेलं. अजमलचा निकाह थांबवण्यात आला. त्याला पोलिस ठाण्यात आणण्यात आलं. विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते पोलिस ठाण्यात आले. पोलिसांनी त्यांना हा जबरदस्तीचा प्रयत्न नसल्याचं पटवून दिलं. यानंतर संतोष कुमारी अजमलला लग्न करण्यासाठी घेऊन पुन्हा दिल्लीला गेली.