सराईत गुन्हेगाराला पोलिस निरीक्षक केक भरवतो तेव्हा…

मुंबई : ज्यांची गुन्हेगारावर दहशत बसायला हवी, ज्यांना पाहून गुन्हेगारांना कापरे भरायला हवे, तेच गुन्हेगाराशी संगनमत करीत असतील, तर ते कायदा व सुव्यवस्था कशी राखणार, असा प्रश्न निर्माण होतो. असाच प्रकार मुंबईच्या एका पोलिस निरीक्षकाच्या बाबतीत घडला. गुन्हेगारांच्या आनंदात पोलिसांनी सहभागी होणे म्हणजे त्यांना दयामाया दाखविणे, त्यांच्यावर वरदस्त ठेवणे असे होते. पोलिस निरीक्षकांनी तरी किमान …
 

मुंबई : ज्यांची गुन्हेगारावर दहशत बसायला हवी, ज्यांना पाहून गुन्हेगारांना कापरे भरायला हवे, तेच गुन्हेगाराशी संगनमत करीत असतील, तर ते कायदा व सुव्यवस्था कशी राखणार, असा प्रश्न निर्माण होतो. असाच प्रकार मुंबईच्या एका पोलिस निरीक्षकाच्या बाबतीत घडला.

गुन्हेगारांच्या आनंदात पोलिसांनी सहभागी होणे म्हणजे त्यांना दयामाया दाखविणे, त्यांच्यावर वरदस्त ठेवणे असे होते. पोलिस निरीक्षकांनी तरी किमान अंतर राखून राहायला हवे; परंतु तसे न होता पोलिस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे गुन्हेगाराशी साटेलोटे व्हायला लागले आहे. गुन्हेगारासोबत मेजवान्या झोडणे आणि त्यांच्या पैशावर माैजमजा करण्यामुळे पोलिसांची प्रतीमा मलीन होत आहे. जोगेश्वरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र नेरलेकर यांनी तर त्यावर कडी केली. गुन्हेगारासोबतचे त्यांचे सख्य त्याचा वाढदिवस साजरा करण्याइतके झाले. नेरलेकर यांनी एका सराईत गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा केला. याबाबतचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून, त्यामुळे नेरलेकर यांचे पितळ उघडे पडले आहे. या व्हिडिओत नेरलेकर एका सराईत गुन्हेगारासोबत केक कापताना दिसत आहेत. संबंधित आरोपीचं नाव दानिश इश्तिखार सय्यद असं आहे.