संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतही कोरोनाबाधित

मुंबई : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते,खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांना याआधीच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शिवसेना वर्तुळासाठी हा तिसरा मोठा धक्का आहे. संजय राऊत यांनी अद्याप कोरोना चाचणी केली …
 

मुंबई : शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते,खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानीदेखील कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य ठाकरे यांना याआधीच कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे शिवसेना वर्तुळासाठी हा तिसरा मोठा धक्का आहे.

संजय राऊत यांनी अद्याप कोरोना चाचणी केली नसली तरी ती लवकरच होण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वर्तुळात चिंतेचे वातावरण आहे. शरद पवार यांच्यावर नुकतीच पोटाची शस़्त्रक्रिया झाली असून ते सध्या ब्रीच वँâडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची प्रकृती उत्तम आहे. वर्षा राऊत यांना दोन दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसत असून त्यांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास जाणवत आहे. त्यामुळे त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असता ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मुंबईतील फोर्टीज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.संजय राऊत यांना कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नसली तरी त्यांचीही कोरोना चाचणी होणार आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले.