संजय राऊतांना उचलून त्यांच्या बेताल बडबडीची एनआयए चौकशी करा

दोन संजय भिडले ; काँग्रेस नेते संजय निरूपम यांची मागणीमुंबई : महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील सुरू असलेले मतभेद थांबायचे नाव घ्यायला तयार नाहीत. युपीए आघाडीच्या नेतृत्वावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांना सातत्याने डिवचणार्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार संजय निरूपम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी सोमवारी सचिन वाझे यांना …
 

दोन संजय भिडले ; काँग्रेस नेते संजय निरूपम यांची मागणी
मुंबई :
महाविकास आघाडीच्या नेत्यांमधील सुरू असलेले मतभेद थांबायचे नाव घ्यायला तयार नाहीत. युपीए आघाडीच्या नेतृत्वावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांना सातत्याने डिवचणार्‍या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा माजी खासदार संजय निरूपम यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांनी सोमवारी सचिन वाझे यांना पोलीस खात्यात परत घेऊ नका. ते डोईजड ठरतील, असे मी शिवसेनेच्या नेत्यांना आधीच बजावले होते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार घेत निरूपम यांनी बेताल बडबड करणार्‍या संजय राऊत यांना राष्ट्रीय तपास संस्था एनआयएने उचलावे आणि त्यांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.काँग्रेसने शिवसेनेसोबत जाण्याला निरूपम यांचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यामुळे ते शिवसेनेवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. निरूपम यांनी म्हटले आहे की, कालपरवापर्यंत वाझे हे प्रामाणिक आणि कार्यक्षम अधिकारी आहेत, असे हेच राऊत सांगत होते. आता ते काहीही म्हणत असले तरीही सचिन वाझे हा कोणाच्या पाठिंब्याने पुन्हा सेवेत आला हे लोकांसमोर आलेच पाहिजे. त्यासाठी एनआयएने संजय राऊत यांच्यासारख्या बेतला बडबड करणार्‍या लोकांना उचलून त्यांची चौकशी केली पहिजे आणि वाझेंच्या कर्त्या-करवित्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, अशी मागणी निरूपम यांनी केली आहे.