वाढदिवसाच्या पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर तिघांचा बलात्कार

पुण्यातील खळबळजनक घटना; मुलीला जीवे मारण्याचाही प्रयत्नपुणे : विद्येचं माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे शहर अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व त्यानंतर तिच्या हत्येच्या प्रयत्नामुळे हादरले आहे. पोलिसांनी खळबळनक घटनेप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही घटना …
 

पुण्यातील खळबळजनक घटना; मुलीला जीवे मारण्याचाही प्रयत्न
पुणे
: विद्येचं माहेरघर व महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी अशी ओळख असलेले पुणे शहर अल्पवयीन मुलीवर झालेला बलात्कार व त्यानंतर तिच्या हत्येच्या प्रयत्नामुळे हादरले आहे. पोलिसांनी खळबळनक घटनेप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.
पुण्यातील वारजे माळवाडी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, एक अल्पवयीन १४ वर्षीय मुलगी तिच्या मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीला गेली होती. त्यावेळी तीन आरोपींनी तिच्यावर बलात्कार केला.या घटनेमुळे मुलीला जबरदस्त मानसिक धक्का बसला. ती घरी जाण्यासाठी निघाली असताना आणखी दोन मित्र येणार आहेत, असे म्हणून तिला अडवले.त्यानंतरही ती घरी जायला निघाल्यानंतर एकाने तिच्या दिशेने गोळी झाडून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यातून ती बचावली. त्यानंतर आरोपींनी तिला घराजवळ आणून सोडले.वारजे परिसरात काही तरुणांकडे पिस्तूल असून त्यांनी गोळीबार केल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलीस पथकाला मिळाली. त्यांनी घटनास्थळी जाऊन काही मुलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता वरील घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी पीडित मुलीचा शोध घेऊन तिला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिच्या जबाबावरून गुन्हा नोंद करून दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या