लग्नाचे आमिष दाखवून पोलीस निरीक्षकानेच केले विधवेवर अत्याचार

नागपूरमधील घटनेने खाकी पुन्हा कलंकित नागपूर : राज्यात खाकी वर्दीवरील गुन्हेगारी कारवायांचे कलंकित डाग वरचेवर वाढत चालले आहेत. बीडमध्ये जन्मठेपेच्या आरोपींसोबत पार्ट्या, मुंबईतील व्यापार्याच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे या अधिकार्याचा कथित सहभाग यापाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकानेच ४५ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच हे प्रकरण …
 

नागपूरमधील घटनेने खाकी पुन्हा कलंकित

नागपूर : राज्यात खाकी वर्दीवरील गुन्हेगारी कारवायांचे कलंकित डाग वरचेवर वाढत चालले आहेत. बीडमध्ये जन्मठेपेच्या आरोपींसोबत पार्ट्या, मुंबईतील व्यापार्‍याच्या मृत्यूप्रकरणी सचिन वाझे या अधिकार्‍याचा कथित सहभाग यापाठोपाठ आता उपराजधानी नागपूरमध्ये एका पोलीस निरीक्षकानेच ४५ वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नसून हा अधिकारी महिलेकडील एक लाख रुपयांची रोकड व दागिने घेऊन पसार झाला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक अरविंद भोळे (वय ५४ रा.प्रâेन्डस कॉलनी नागपूर) याच्याविरोधात गिट्टीखदान पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अरविंद भोळे हा नागपूरच्या नियंत्रण कक्षात तैनात असल्याचे समजते. पीडित महिलेच्या पतीचे काही अपघाती निधन झाल्याने ती मुलांसह राहत होती. जानेवारी २०१९ मध्ये फेसबुकवरून ओळख झाली.त्यानंतर आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवल्याने ती अमरावतीहून नागपूरला आली.त्यानंतर अधिकार्‍याने एकेठिकाणी महिलेल्या गळ्यात हार घालून लग्नाचा बनाव केला व तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केला.तसेच उपचाराच्या बहाण्याने तिच्याकडील रोख रक्कम व दागिने घेऊन तो पसार झाला.