रूळावरून रेल्वेचा डबा घसरला, अकोला जिल्ह्यातील घटना

अकोला (महाराष्ट्र न्यूज लाइव्ह वृत्तसेवा) ः हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा एक डबा रूळावरून घसरला. ही घटना आज, 9 मार्चला सकाळी सव्वा अकराला अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान घडली. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र अप व डाऊन लाईनवरची रेल्वे वाहतूक विस्कळित झाली. वडाहून मुंबईकडे जाणारी ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी नियमित वेळेवर धावत असताना काटेपूर्णा …
 

अकोला (महाराष्ट्र न्‍यूज लाइव्‍ह वृत्तसेवा) ः हावडा-मुंबई गितांजली एक्स्प्रेसचा एक डबा रूळावरून घसरला. ही घटना आज, 9 मार्चला सकाळी सव्वा अकराला अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू ते काटेपूर्णा दरम्यान घडली. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. मात्र अप व डाऊन लाईनवरची रेल्वे वाहतूक विस्कळित झाली.

वडाहून मुंबईकडे जाणारी ०२२६० क्रमांकाची विशेष गाडी नियमित वेळेवर धावत असताना काटेपूर्णा ते बोरगाव मंजू रेल्वे स्थानकादरम्यान आली. गाडीचा शेवटचा डबा (एसएलआर) अचानक रुळावरून घसरला. त्‍यामुळे रेल्वे थांबली. मोठा आवाज झाल्याने प्रवाशी भयभीत झाले. रेल्वेच्या अधिकारी व रेल्वे पोलिसांनी धावून येत तातडीने डबा रूळावरून बाजूला करण्याच्‍या हालचाली केल्या.