बंद मॉलमध्ये आढळला पोलीस अधिकार्‍याचा मुलाचा मृतदेह

नागपूर शहरातील धक्कादायक घटना नागपूर : नागपूर शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील एका बड्या मॉलमध्ये एका पोलीस अधिकार्याच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अर्थात हा मॉल काही दिवसांपासून बंद होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.मुलाची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पण हत्या का व कशासाठी झाली हे …
 

नागपूर शहरातील धक्कादायक घटना

नागपूर : नागपूर शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील एका बड्या मॉलमध्ये एका पोलीस अधिकार्‍याच्या मुलाचा मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अर्थात हा मॉल काही दिवसांपासून बंद होता. याबाबत माहिती मिळताच पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.मुलाची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. पण हत्या का व कशासाठी झाली हे अद्याप समजू शकलेले नाही. पोलिस आरोपी व घटनेमागील कारणाचा शोध घेत आहेत. सूत्रांनी सांगितले की सीताबर्डी मेट्रो स्टेशनसमोरील फॉर्च्युन मॉलमध्ये अतिरिक्त पोलीस निरीक्ष नरेंद्र बघेला यांच्या मुलाचा मुलाचा मृतदेह आढळला.बघेला हे सध्या नागपूर शहरातच एमआयडीसी ठाणे परिसरात कार्यरत आहेत हे, विशेष! हा मॉल काही दिवसांपासून बंद असल्याचे लक्षात घेऊन त्याठिकाणी ही हत्या घडवून आणली असावी, असा संशय पोलिसांना आहे.