मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आपल्यावर पाळत ठेवल्याचा पटोलेंचा आरोप

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवार यांनी आपल्यावर बोलावं, असं काही करणार नाही, असं सांगून काही तास होत नाहीत, तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप केला. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोपाची आणि टीकेची एकही संधी …
 

पुणे ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फटकारल्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पवार यांनी आपल्यावर बोलावं, असं काही करणार नाही, असं सांगून काही तास होत नाहीत, तोच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्यावर पाळत ठेवून असल्याचा गंभीर आरोप केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोपाची आणि टीकेची एकही संधी पटोले सोडत नाहीत. त्यांच्या वक्तव्यामुळं सत्ताधारी तीनही पक्षांतच विसंवाद असून, काँग्रेसच्या मंत्र्याचीही त्यामुळे अडचण होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पटोले सोडत असलेल्या वाग्बाणांमुळे आघाडीतील वाद विकोपाला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पटोले यांनी, ‘महाराष्ट्र काँग्रेसची भूमी असल्याचं मी सोनिया गांधी यांना सांगितलं आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता आणायची आहे, असं आश्वासन मी त्यांना दिलं आहे, असं सांगताना, ‘फोन टॅपिंगबद्दल मी विधानसभेत भूमिका मांडली होती. मला काही ते सुखाने जगू देणार नाहीत. सत्तेत सोबत असले, तरी मुख्यमंत्रिपद, गृहमंत्रिपद त्यांच्याकडे आहे,’ अशा शब्दांत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला.