महाबळेश्वरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्‍याचार; प्रेग्‍नंट राहून बाळाला दिला जन्‍म!!

महाबळेश्वर : पुणे, मुंबईनंतर आता महाबळेश्वरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आले आहे. दोघांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्म दिला. बाळाला मुंबईतील चौरसिया कुटुंबाला दत्तक दिले. मात्र दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबही केला नाही. हा प्रकार वाईच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांना कळला आणि …
 
महाबळेश्वरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्‍याचार; प्रेग्‍नंट राहून बाळाला दिला जन्‍म!!

महाबळेश्वर : पुणे, मुंबईनंतर आता महाबळेश्वरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्‍याचाराचे प्रकरण समोर आले आहे. दोघांनी वारंवार लैंगिक अत्‍याचार केल्यानंतर मुलगी गर्भवती राहिली आणि तिने मुलीला जन्‍म दिला. बाळाला मुंबईतील चौरसिया कुटुंबाला दत्तक दिले. मात्र दत्तक देताना कायदेशीर प्रक्रियेचा अवलंबही केला नाही. हा प्रकार वाईच्‍या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे यांना कळला आणि बिंग फुटले. त्‍यांनी पीडितेच्‍या घरी भेट दिली. तिच्‍या कुटुंबियांना विश्वासात घेतले, तेव्‍हा संपूर्ण धक्कादायक प्रकरणाचा उलगडा झाला.

पीडिता महाबळेश्वरमध्ये मजुरी करते. तिच्‍यावर सागर गायकवाड आणि आशुतोष बिरामणे यांची नजर पडली आणि त्‍यांनी वारंवार लैंगिक अत्‍याचार केला. यातून ती प्रेग्‍नंट राहिली. काही दिवसांपूर्वी तिची प्रसुती घरातच करण्यात आली. तिने मुलीला जन्‍म दिला. या घटनेची वाच्यता कुठे होऊ नये म्‍हणून या मुलीला दत्तक देण्याची प्रक्रियाही पार पाडली.

मुंबईतील चौरसिया कुटुंबाला ही मुलगी दत्तक देण्यात आली. मात्र यासाठी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्‍यामुळे पोलिसांनी गायकवाड, बिरामणे या मुख्य आरोपींसह त्‍यांना मदत करणाऱ्या ९ जण आणि दत्तक घेणाऱ्या चौरसिया दाम्‍पत्‍याविरुद्ध गुन्‍हा नोंदवला. अटक केलेल्यांत माजी नगराध्यक्ष डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या मुलांचाही समावेश आहे. त्‍यामुळे खळबळ उडाली आहे. राजकीय दबाव आणून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्‍न झाला होता. मात्र उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. जानवे यांनी या प्रकरणात लक्ष घालून आरोपींना गजाआड करण्यात मोठी भूमिका बजावली. विशेष माजी नगराध्यक्षाचा मुलगा योगेश यापूर्वीही अशाच प्रकरणात अडकला होता. तयाने व्हॉट्‌स ॲपवर अश्लील चित्रफित व्हायरल केली होती.