भर पावसात स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री पंढरपूरला रवाना

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असताना या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह स्वतः गाडी चालवित पंढरपूरकडे रवाना झाले. त्यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे शासकीय महापूजा होणार आहे. पंढरपूरमध्ये ही महापूजा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला चालक तसेच अन्य स्टाफ असतो. कॅनव्हाय असतो. लावाजमा असतो. मुख्यमंत्र्यांना खास विमानानं किंवा हेलिकाॅप्टरनंही जाता आलं …
 

मुंबई : आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा आहे. मुंबईत मुसळधार पाऊस असताना या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटुंबीयांसह स्वतः गाडी चालवित पंढरपूरकडे रवाना झाले. त्यांच्या हस्ते मंगळवारी पहाटे शासकीय महापूजा होणार आहे.

पंढरपूरमध्ये ही महापूजा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला चालक तसेच अन्य स्टाफ असतो. कॅनव्हाय असतो. लावाजमा असतो. मुख्यमंत्र्यांना खास विमानानं किंवा हेलिकाॅप्टरनंही जाता आलं असतं; परंतु हा सारा मोह टाळून मुख्यमंत्री त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन स्वतः वाहन चालवित पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. पूर्वी आषाढी वारीचे हेलिकाॅप्टरमधून फोटो काढणारे ठाकरे आता मुख्यमंत्री झाल्यानंतर साधेपणाने वागायला लागले आहेत. मुंबई परिसरात अतिमुसळधार पाऊस होता. प्रवासातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री कार्यालयाने ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाला रस्ते प्रवासाचा सल्ला दिला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत होते. त्यांच्या शेजारी पत्नी रश्मी बसल्या होत्या.