प्रियकराला वश करण्यासाठी तिने बंगाली बाबा कामाला लावला..!; साडेचार लाखांनी फसली कॉम्‍प्‍युटर इंजिनिअर तरुणी!!

मुंबई ः शिक्षणाने माणसे शहाणी होतात, असे म्हटले जाते; परंतु तसे होत नाही. उच्चशिक्षित लोकही अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या आहारी जातात. पुण्यात एका राजकीय अध्यात्म गुरूने उद्योजकाला सुनेचा छळ करण्यास भाग पाडल्याचा सल्ला ताजा असताना आता मुंबईतही एक संगणक अभियंता तरुणी बंगाली बाबाच्या नादी लागून साडेचार लाख रुपयांना फसली. प्रेम दोन्ही बाजूंनी व्हावे लागते. ओरबाडून ते …
 

मुंबई ः शिक्षणाने माणसे शहाणी होतात, असे म्हटले जाते; परंतु तसे होत नाही. उच्चशिक्षित लोकही अंधश्रद्धा, काळ्या जादूच्या आहारी जातात. पुण्यात एका राजकीय अध्यात्म गुरूने उद्योजकाला सुनेचा छळ करण्यास भाग पाडल्याचा सल्ला ताजा असताना आता मुंबईतही एक संगणक अभियंता तरुणी बंगाली बाबाच्या नादी लागून साडेचार लाख रुपयांना फसली.

प्रेम दोन्ही बाजूंनी व्हावे लागते. ओरबाडून ते मिळत नाही, याचा विश्वास अलीकडच्या काळातील पिढीचा राहिलेला नाही. काळी जादू, भानामती असे काहीही नसते; परंतु २१ व्या शतकातील तरुण पिढी मध्ययुगीन मानसिकतेतून बाहेर आलेली नाही. महाराष्ट्र सरकारने जादूटोणाविरोधी कायदा करूनही तिला त्याची माहित नाही. मुंबईत राहणारी एक २६ वर्षीय तरुणी प्रियकराला वश करण्यासाठी प्रेमाचे जाळे टाकण्याऐवजी बंगाली बाबाच्या नादी लागली. त्यानेही या तरुणीच्या मानसिकतेचा गैरफायदा घेतला. खारघरमध्ये राहणाऱ्या २६ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअर तरुणीकडून तब्बल चार लाख ५७ हजार रुपये उकळले; परंतु प्रियकर काही वश झाला नाही. बंगाली बाबा वसिम रईस खान उर्फ बाबा कबीर खान बंगाली (३३) या भामट्याने फसवणूक केल्याचे तिच्या लक्षात आले. तक्रार मिळताच गुन्हे शाखा युनिट- दोनच्या पथकाने मिरा रोड येथून त्याला अटक केली आहे. या बाबा बंगाली याने अशाच पद्धतीने अनेकांची फसवणूक केली असण्याची आहे.