न्‍यूड फोटो व्‍हायरल करण्याची धमकी देऊन १६ वर्षीय मुलीवर नैसर्गिक, अनैसर्गिक अत्‍याचार!

पुणे ः प्रेमाच्या जाळ्यात फासल्यानंतर १६ वर्षीय मुलीला तिचे नग्न फोटो पाठविण्यास सांगण्यात आले. नंतर तिला त्याच फोटोच्या आधारे त्याने ब्लॅकमेलिंग करत तिच्यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्याचार केले. पुण्यात अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवित त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. वृषभ सुधीर शिंदे ( १९ रा. आंबेगाव पठार) याने एका १६ …
 

पुणे ः प्रेमाच्‍या जाळ्यात फासल्यानंतर १६ वर्षीय मुलीला तिचे नग्‍न फोटो पाठविण्यास सांगण्यात आले. नंतर तिला त्‍याच फोटोच्‍या आधारे त्‍याने ब्‍लॅकमेलिंग करत तिच्‍यावर नैसर्गिक व अनैसर्गिक अत्‍याचार केले.

पुण्यात अल्पवयीन मुलींना लग्नाचे आमिष दाखवित त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवून नंतर फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. वृषभ सुधीर शिंदे ( १९ रा. आंबेगाव पठार) याने एका १६ वर्षांच्या मुलीशी ओळख वाढविली. तिला विश्वासात घेतले. तिला लग्नाचे आमिष दाखविले. तिच्याशी वारंवार नैसर्गिक व अनैसर्गिक पद्धतीने लैंगिक संबंध ठेवले. या मुलीला तिचे नग्न फोटो पाठविण्यास सांगितले. लग्न होणार असल्यानं आणि भावी पतीच फोटो मागवित असल्यानं त्यावर विश्वास ठेवून तिनं स्वतःचे नग्न फोटो वृषभला पाठवून दिले; परंतु याच फोटोचा तो आता ब्लॅकमेलिंगसाठी गैरवापर करणअयाची धमकी देत आहे. तेवढ्यावरच हा तरुण थांबलेला नाही. त्यानं तिला शिवागीळ केली आणि मारहाणही केली. अखेर असह्य झाल्यानं तिनं पोलिस ठाण्यातच धाव घेली.पोलिसांनी वृषभच्या मुसक्या आवळून त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचार आणि सायबर क्राईमखाली गुन्हा नोंदविला आहे.