नीलेश राणेंची टीका… पहाटेच्‍या शपथविधीनंतर साहेबांनी घरात घेतलं नसतं तर…

मुंबई (मुंबई लाइव्ह वृत्तसेवा) ः अजित पवारांचे बडबडणे नवे नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर मोठ्या साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, अशी खोचक टिपण्णी नीलेश राणेंनी केली आहे. काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांत वाक्युद्ध रंगले आहे. चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू असताना नीलेश राणेंनी थेट जिव्हारी घाव घातला …
 

मुंबई (मुंबई लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अजित पवारांचे बडबडणे नवे नाही. पहाटेच्या शपथविधीनंतर मोठ्या साहेबांनी घरी घेतलं नसतं तर तुमची लायकी काय झाली असती विचार करा, अशी खोचक टिपण्णी नीलेश राणेंनी केली आहे.

काही दिवसांपासून सत्ताधारी व विरोधकांत वाक्‌युद्ध रंगले आहे. चंद्रकांत पाटील आणि अजित पवारांमध्ये आरोप प्रत्‍यारोप सुरू असताना नीलेश राणेंनी थेट जिव्‍हारी घाव घातला आहे. मराठा समाजासाठी काही जण आवाज उठवत आहेत. त्यांचा आवाका मोजण्याचं धाडस अजित पवारांनी करू नये. मराठ्यांचा अपमान करू नका, असेही राणे यांनी म्‍हटले आहे. आता त्‍यावर पवार उत्तर देतात का हे पाहावे लागेल.