नाशिकच्या छापखान्यातून पाच लाखांच्या नोटा गायब

नाशिक ः कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिला चकवा देत नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्या. दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून काढीत पाच लाख रुपये कुठे गेले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी नोट प्रेसमधील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरू होती. …
 

नाशिक ः कडेकोट सुरक्षा व्यवस्था असतानाही तिला चकवा देत नाशिक येथील करन्सी नोट प्रेसमधून पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्या. दोन आठवड्यांपूर्वी ही घटना घडूनही अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

कडेकोट सुरक्षाव्यवस्था भेदून काढीत पाच लाख रुपये कुठे गेले, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी नोट प्रेसमधील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरू होती. आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब होण्यामागे मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त होत आहे. या छापखान्यातून पाचशे रुपयांच्या नोटांची दहा बंडले गायब झाली आहेत. करन्सी नोट प्रशासनाने या प्रकाराची गोपनीय चौकशी सुरू केली आहे. अंतर्गत चौकशी करूनही प्रशासन पाच लाख रुपयांच्या चोरीचा तपास लावू शकलेले नाही. नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशे रुपयांच्या नोटांची छपाई होते. तिथे १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात.