दोन लग्न झालेल्या “बापू’ने पळविले आणखी एका मुलीस!

सिल्लोड : दोन लग्ने झालेली असतानाही बापू काळेला मुलींचा भलताच शाैक आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा गैरफायदा घेण्यात बापू पटाईत आहे. पोलिस आणि नागरिकांनी सांगूनही त्याची ही सवय सुटत नाही. आता त्याने आणखी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या मोहजालात अडकवून पळवून नेले आहे. तीन महिने झाले, तरी तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याची माहिती देणासाठी बक्षीस …
 
दोन लग्न झालेल्या “बापू’ने पळविले आणखी एका मुलीस!

सिल्लोड : दोन लग्ने झालेली असतानाही बापू काळेला मुलींचा भलताच शाैक आहे. मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचा गैरफायदा घेण्यात बापू पटाईत आहे. पोलिस आणि नागरिकांनी सांगूनही त्याची ही सवय सुटत नाही. आता त्याने आणखी एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या मोहजालात अडकवून पळवून नेले आहे. तीन महिने झाले, तरी तो सापडत नसल्याने पोलिसांनी त्याची माहिती देणासाठी बक्षीस ठेवले आहे.

बापूचे वय 38 आहे. त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले आहे. सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी बापूची माहिती देणाऱ्यास २१ हजार रुपये बक्षीस जाहीर केले आहे. पोलिस उपनिरीक्षक पंडित इंगळे यांनी अशी माहिती असणाऱ्यांना पोलिसांशी संपर्क साधा, असे आवाहन केले आहे. बापू सुभाष काळे हा सिल्लोड तालुक्यातील पिरोळा येथील रहिवाशी आहे. त्याची दोन लग्ने झाली आहेत. दोन्ही बायका हयात आहेत. त्याने पळशी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला घेऊ तो पसार झाला. त्याच्याविरोधात ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बापूच्या घराशेजारी मुलीचे नातेवाइक राहतात. त्याच्यासोबत आता पळून गेलेली मुलगी नातेवाइकांकडे काही दिवस राहण्यासाठी आली होती. त्या वेळी तिची आणि बापूची ओळख झाली. ओळखीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यचा गैरफायदा घेऊन त्याने मुलीला पळवून नेले. बापू मुलींना प्रेमात ओढून फसवतो. यापूर्वीही त्याने असे प्रकार केले आहेत.