दोन ‘दादां’च्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

चंद्रकांतदादांनी घेतली अजितदादांची भेट पुणे : एका पक्षाचा राजकीय नेता दुसर्या पक्षातील नेत्याला भेटला की राजकीय वर्तुळात त्याबाबत लगेच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विधिमंडळाचे अधिवेशन नुकतेच संपले असून त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपुरात …
 

चंद्रकांतदादांनी घेतली अजितदादांची भेट

पुणे : एका पक्षाचा राजकीय नेता दुसर्‍या पक्षातील नेत्याला भेटला की राजकीय वर्तुळात त्याबाबत लगेच वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जातात. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. विधिमंडळाचे अधिवेशन नुकतेच संपले असून त्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रकांत दादा पाटील यांनी नागपुरात जाऊन सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्याच्यातील चर्चेचा तपशील बाहेर आलेला नसला तरी राज्यातील ठाकरे सरकारच्या कामगिरीबाबत विस्ताराने चर्चा झाल्याचे समजते. भाजपचे आणखी एक नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यांत राज्यात ठाकरे सरकार जाऊन पुन्हा फडणवीस सरकार येईल, असे भाकित केले आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीने आश्चर्य व्यक्त होत आहे. चंद्रकांतदादा आणि अजित पवार यांच्यात कोणती राजकीय चर्चा झाली हे बाहेर आले नाही. पण सूत्रांनुसार ही भेट पुण्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, संभाव्य लॉकडाऊन याबाबत होती, असे समजते. शिवाय पुण्यात दरवर्षी पावसाळ्यात पूर येते व मोठे नुकसान होते. त्यामुळे पुणे महापालिकेला नालेसफाईसाठी ३०० कोटी रुपयांचा भरीव आर्थिक निधी द्यावा, अशी मागणी पाटील यांनी अजितदादांकडे केल्याचे समजते