दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री

मुंबई : हायकोर्टाच्या निकालानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तशी सूचना त्यांनी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांना दिली आहे. दरम्यान ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असून तो त्यांनी मंजूर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वळसे …
 

मुंबई : हायकोर्टाच्या निकालानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता राज्याच्या गृहमंत्रीपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तशी सूचना त्यांनी राज्यपाल भगतिंसह कोश्यारी यांना दिली आहे. दरम्यान ठाकरे यांनी देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडे पाठवला असून तो त्यांनी मंजूर केला असल्याचे सूत्रांनी सांगितले. वळसे पाटील सध्या ठाकरे सरकारमध्ये कामगारमंत्री होते.त्याचा कारभार हसन मुश्रीफ यांच्याकडे तसेच वळसे पाटील यांच्याकडील राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कारभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.मुख्यमंत्र्यांनी या बदलास मंजुरी दिली असून या बदलाची कल्पना राज्यपाल कोश्यारी यांना दिली आहे.दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. अनेक वर्षे त्यांनी शरद पवारांचे स्वीय सचिव म्हणूनही काम केले आहे.