“तिथं’ बोट घालणं हाही बलात्कारच!

मुंबई : एखाद्या महिलेच्या योनीत बळबजबरीनं लिंग घालणं हाच केवळ बलात्कार ठरत नाही, तर योनीत बोटांचा वापर करणं हाही बलात्कारच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदविलं आहे. एका गतिमंद मुलीच्या योनीत बोटाचा वापर केल्या प्रकरणात आरोपीची शिक्षा न्यायालयानं कायम केली आहे. मुंबईतील मालाड इथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप एका ३३ …
 

मुंबई : एखाद्या महिलेच्या योनीत बळबजबरीनं लिंग घालणं हाच केवळ बलात्कार ठरत नाही, तर योनीत बोटांचा वापर करणं हाही बलात्कारच आहे, असं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयानं नोंदविलं आहे. एका गतिमंद मुलीच्या योनीत बोटाचा वापर केल्या प्रकरणात आरोपीची शिक्षा न्यायालयानं कायम केली आहे.

मुंबईतील मालाड इथे राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप एका ३३ वर्षीय तरुणावर आहे. आरोपी आणि पीडिता एकाच परिसरात राहतात. या तरुणानं पीडितेला जत्रेच्या निमित्तानं फिरायला नेऊन एका निर्जनस्थळी तिच्यासोबत जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र पीडिता रडायला लागल्याने तो घाबरला. तिला त्यानं घरी सोडले. पीडितेनं आपल्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी त्याच्या विरुद्ध बलात्काराची तक्रार केली.

आरोपनिश्चितीनंतर त्याला बलात्कार आणि अपहरण प्रकरणी शिक्षा सुनावण्यात आली. त्या शिक्षेला त्याने आव्हान दिले. मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती रेवती मोहिते- ढेरे यांच्यासमोर सुनावणी पार पडली. बलात्काराचा आरोप काढून त्या ऐवजी लैंगिक अत्याचाराचा आरोप करावा, अशी मागणी आरोपीनं केली. बलात्काराच्या व्याख्येनुसार लिंगाचा योनीत जबरदस्तीनं प्रवेश होणं अपेक्षित असतं; पण आरोपीनं केवळ बोटांचा वापर केल्यानं हे प्रकरण लैंगिक अत्याचार म्हणून चालवण्यात यावं अशी मागणी त्यानं केली; मात्र लिंगाऐवजी बोटांचा वापर हा देखील बलात्कारच असल्याचे उच्च न्यायालयानं स्पष्ट केलं.