कोरोना रुग्ण महाराष्ट्रात सर्वाधिक, लसीचा पुरवठा मात्र इतर राज्यांना

केंद्र सरकारचा अजब न्याय; हवे होते ४० लाख डोस, मिळाले अवघे ७ लाख मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण देशभरात चिंताजनक असल्याचे मोदी सरकारनेही मान्य केले आहे. अशा स्थितीत कोरोना लसींचा पुरवठा महाराष्ट्रालाच सर्वाधिक संख्येने व्हायला हवा होता. पण तसे होताना दिसत नसून महाराष्ट्रापेक्षा इतर भाजपशासित राज्यांना कोरोनाची …
 

केंद्र सरकारचा अजब न्याय; हवे होते ४० लाख डोस, मिळाले अवघे ७ लाख

मुंबई : महाराष्ट्रात सर्वाधिक वेगाने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. राज्यातील कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण देशभरात चिंताजनक असल्याचे मोदी सरकारनेही मान्य केले आहे. अशा स्थितीत कोरोना लसींचा पुरवठा महाराष्ट्रालाच सर्वाधिक संख्येने व्हायला हवा होता. पण तसे होताना दिसत नसून महाराष्ट्रापेक्षा इतर भाजपशासित राज्यांना कोरोनाची लस जास्त प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्राला ४० लाख लसींचा साठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तशी मागणीही महाराष्ट्र सरकारने केदांकडे केली आहे. प्रत्यक्षा महाराष्टाला केवळ ७ लाख लसींचा पुरवठा झाला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ४.५ लाख इतकी आहे. मृतांची संख्या ५७ हजार हजार असून एकूण बाधितांची संख्या ३० लाखांच्या घरात गेली आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राल केवळ ७.५० हजार लस कसे पुरणार? असा प्रश्न टोपे यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

महाराष्ट्राच्या तुलनेत मध्य प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, गुजरात आदी राज्यांना जास्त प्रमाणात लसीचे डोस देण्यात आली आहे. उत्तरा प्रदेश,मध्य प्रदेशला ४०, गुजरातला ३० लाख तर हरियाणाला २४ लाख लसींचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांत लसीचा तुटवडा निर्माण झाला असून येत्या दोन – दिवसांत लस न मिळाल्यास लसीकरण थांबण्याचा धोका आहे. यावरून सध्या राज्य सरकार व भाजप,विरोधी पक्षांत आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. दरम्यान टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना फोन करून ही बाब कानावर घातली असून त्यांनी लसींचा पुरवठा वाढविण्याचे आश्वासन दिले आहे,असे टोपे यांनी सांगितले.