“कार्यकर्ते ऐकत नाहीत अजित पवारांचे…’

पुणे (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आपण प्रमुख राजकीय पक्ष मानत नाही. आधी अजित पवार हे शरद पवारांचे ऐकत नाहीत अशी चर्चा होती. आता कार्यकर्तेच दादांचे ऐकत नाहीत, अशी टीका पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. भाजपची सेनेसोबत नैसर्गिक अन् हिंदुत्वावर आधारित युती असून, दोन्हीही पक्षांचा श्वास हिंदुत्व हाच …
 

पुणे (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला आपण प्रमुख राजकीय पक्ष मानत नाही. आधी अजित पवार हे शरद पवारांचे ऐकत नाहीत अशी चर्चा होती. आता कार्यकर्तेच दादांचे ऐकत नाहीत, अशी टीका पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी केली आहे. भाजपची सेनेसोबत नैसर्गिक अन्‌ हिंदुत्वावर आधारित युती असून, दोन्हीही पक्षांचा श्वास हिंदुत्व हाच आहे. निर्णय काय घ्यायचा हे शिवसेनेच्या हाती आहे. भविष्यात सेनेसोबत युती झाल्यास भाजपच्या कार्यकर्त्यांना आनंदच होईल, असेही बापट म्‍हणाले.