अबू आझमीमुळेच भडकला हिंसाचार?

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी समाजवादी पक्षाचे नेते अबु आसिम आझमी यांच्याशी संबंध जोडून त्यांच्या चौकशीची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या भाषणाशी या हिंसाचाराचा संबंध आहे का हे तपासण्याची गरज भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. हिंसाचारामागचा …
 

मुंबई (लाइव्ह ग्रुप वृत्तसेवा) ः प्रजासत्ताक दिनी दिल्लीत झालेल्या हिंसाचाराशी समाजवादी पक्षाचे नेते अबु आसिम आझमी यांच्याशी संबंध जोडून त्यांच्या चौकशीची मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. मुंबईतील आझाद मैदानात झालेल्या भाषणाशी या हिंसाचाराचा संबंध आहे का हे तपासण्याची गरज भातखळकर यांनी व्यक्त केली आहे. हिंसाचारामागचा खरा मास्टरमांइड शोधून काढणे गरजेचे असल्याचेही भातखळकर यांनी म्हटले आहे. घर घर से बाहर निकलो, कोहराम मचा दो, मोदी तेरी राख कर देंगे. मोदीजी तुम खत्म हो जाओगे, अशी वक्तव्ये आझमी यांनी केली होती.