‘बुलडाणा लाइव्‍ह’ अत्‍यंत कमी काळात बुलडाणेकरांच्‍या मनात उतरले : सभापती श्रीधर उन्‍हाळे; ‘सहकार नेते’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन; शेतकऱ्यांसाठी शुद्ध पेयजल मशिनचेही लोकार्पण

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सहकार नेते, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंगदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्ह्याची पहिली लोकल न्यूज वेबसाईट बुलडाणा लाइव्हतर्फे आज, 31 मार्चला सहकार नेते या विशेषांकाचे प्रकाशन आणि शेतकऱ्यांसाठी शुद्ध पेयजल मशिनचा शुभारंभ बाजार समितीत झाला. प्रारंभी काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, सभापती श्रीधरराव उन्हाळे …
 
‘बुलडाणा लाइव्‍ह’ अत्‍यंत कमी काळात बुलडाणेकरांच्‍या मनात उतरले : सभापती श्रीधर उन्‍हाळे; ‘सहकार नेते’ विशेषांकाचे थाटात प्रकाशन; शेतकऱ्यांसाठी शुद्ध पेयजल मशिनचेही लोकार्पण

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः सहकार नेते, जिल्‍हा परिषद माजी उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पांडुरंगदादा पाटील यांच्‍या वाढदिवसानिमित्त बुलडाणा जिल्ह्याची पहिली लोकल न्‍यूज वेबसाईट बुलडाणा लाइव्‍हतर्फे आज, 31 मार्चला सहकार नेते या विशेषांकाचे प्रकाशन आणि शेतकऱ्यांसाठी शुद्ध पेयजल मशिनचा शुभारंभ बाजार समितीत झाला.

प्रारंभी काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील, सभापती श्रीधरराव उन्हाळे यांच्याहस्ते शुद्ध पेयजल मशीनचे लोकार्पण झाले. त्‍यानंतर सहकार नेते विशेषांक पुरवणीचे विमोचन झाले. बुलडाणा लाईव्ह विश्वासार्ह न्‍यूज पोर्टल असून, अत्‍यंत कमी काळात जिल्हावासियांच्‍या मनात ही वेबसाईट उतरली. सत्य, निर्भिड बातम्‍या देणाऱ्या बुलडाणा लाइव्‍हने पांडुरंगदादांच्‍या वाढदिवसानिमित्त विशेषांक प्रसिद्ध करून दादांचा जो सन्मान व सत्कार केला. त्याबद्दल सभापती या नात्याने बुलडाणा लाईव्हचा आभारी आहे, असे गौरवोद्‌गार यावेळी बाजार समितीचे सभापती श्रीधर उन्हाळे यांनी काढले. ज्ञानेश्वर दादा पाटील यांनीही बुलडाणा लाईव्हचे आभार मानले. महाराष्ट्रातील शेगाव ही पहिली कृषी उत्पन्न बाजार समिती आहे तिथे शुद्ध पेयजल मशीनचा शुभारंभ करण्यात आला. या मशीनचे पाणी अनेक आजारांवर मात करणारे आहे, असे प्रतिपादन या मशीनचे पाणी सहा महिन्यांपासून वापरणारे सचिव विलास फुंडकर यांनी व्यक्त केले. रमेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शेषराव पहूरकार, संचालक पुंडलिक भिवटे, संचालक नीलेश राठी, संचालक रामरतन पुंडकर, संचालक सुरेश पाटील कराळे, खरेदी विक्री संघ अध्यक्ष रघुनाथ भांबेरे, घनश्याम माळी, माजी सभापती गजानन भटकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विलास पुंडकर, डॉक्टर हेमंत हिंगणे, ॲड. गणेश पिसे, देवमन शेजोले, अविनाश बाठे, प्राध्यापक भूषण दाभाडे पाटील, डॉक्टर जयंतराव खेडकर, मयूर अग्रवाल, भूषण पारस्कर, राजेश चुगवणी, मनोज खंडेलवाल, सचिन कलोरे, विष्णू टिबडेवाल, श्रीकांत दादा मारोडे उपस्थित होते.