२५,००,००० रुपये देतो… रात्री झोपायला ये!; खामगावात भररस्त्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेला पैशांचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार खामगावमध्ये समोर आला आहे. ही घटना काल, ८ ऑक्टोबर रोजी खामगाव येथील सत्र न्यायालयासमोर घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गिरधारीलाल विठ्ठलदास सोनी (४०, रा. मोहन टॉकीज परिसर, खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित ३५ वर्षीय महिला खामगाव येथील …
 
२५,००,००० रुपये देतो… रात्री झोपायला ये!; खामगावात भररस्त्यात विवाहितेला शरीरसुखाची मागणी

खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ३५ वर्षीय विवाहितेला पैशांचे आमिष दाखवून शरीरसुखाची मागणी करण्यात आल्याचा प्रकार खामगावमध्ये समोर आला आहे. ही घटना काल, ८ ऑक्टोबर रोजी खामगाव येथील सत्र न्यायालयासमोर घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून गिरधारीलाल विठ्ठलदास सोनी (४०, रा. मोहन टॉकीज परिसर, खामगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित ३५ वर्षीय महिला खामगाव येथील दालफैल भागात राहते. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, गिरधारीलालशी तिचा जागेचा वाद सुरू आहे. काल कोर्टात या प्रकरणाची सुनावणी असल्याने सकाळी अकराला ती कोर्टात गेली होती. दुपारी २ वाजता स्कुटीने कोर्टाच्या आवारातून बाहेर पडत असताना दीपक जाधव नावाच्या व्यक्तीने तिला आवाज दिला.

“साहेबांना तुम्हाला बोलायचंय’, असे तो म्हणाला. महिला थांबली असता गिरधारीलाल तिला म्हणाला, की “दहा लाखांसाठी कोर्टात कशाला लढते. मी तुम्हाला २५ लाख रुपये देतो. फक्त तू माझ्याकडे रात्री झोपायला ये’, असे म्हणत त्याने तिच्‍याकडे शरीरसुखाची मागणी केली. त्यामुळे पीडित महिलेने थेट शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गिरीधारीलाल सोनीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकाँ विजय मिरगे करत आहेत.