संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर नांदुऱ्यात कारवाई, एकाविरुद्ध थेट गुन्हा दाखल
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरासह तालुक्यात संचारबंदीची अंमलबजावणी करताना आज, 11 एप्रिलला पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चोक, रेल्वेस्टेशन चौक, मधुबन चौकात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नगर परिषद प्रशासन व पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका जणाविरुद्ध गुन्हा …
Apr 11, 2021, 18:51 IST
नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः नांदुरा शहरासह तालुक्यात संचारबंदीची अंमलबजावणी करताना आज, 11 एप्रिलला पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चोक, रेल्वेस्टेशन चौक, मधुबन चौकात विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. नगर परिषद प्रशासन व पोलिसांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोणीही विनाकारण, विनामास्क घराबाहेर पडू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक सुरेश नाईकनवरे यांनी केले आहे.