शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर रानडुकराचा हल्ला!; नांदुरा तालुक्‍यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील माळेगाव गोंड येथे शेतात मशागत करत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना 13 जून रोजी दुपारी 4 च्या सुमारास घडली. पांडुरंग राजाराम भारंबे (53) हे आपल्या शेतात काम करत असताना मागून येऊन रानडुकराने अचानक हल्ला चढवला. यात त्यांच्या डाव्या पायाला व डाव्या …
 

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील माळेगाव गोंड येथे शेतात मशागत करत असलेल्या शेतकऱ्यावर रानडुकऱ्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना 13 जून रोजी दुपारी 4 च्‍या सुमारास घडली.

पांडुरंग राजाराम भारंबे (53) हे आपल्या शेतात काम करत असताना मागून येऊन रानडुकराने अचानक हल्ला चढवला. यात त्यांच्या डाव्या पायाला व डाव्या हाताला गंभीर जखमा केल्या. हल्ल्यानंतर पांडुरंग बरडे जवळपास एक तास शेतात पडले होते. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्याच्याकडे धाव घेऊन त्यांना तात्काळ नांदुरा येथील दवाखान्यात भरती केले.

प्राथमिक उपचार करून त्‍यांना प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले. हा शेतकरी अल्पभूधारक असून त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा. तसेच वनविभागाने प्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करून पिकांचे व शेतकऱ्यांचे या प्राण्यांपासून संरक्षण करावे, अशी मागणी पुढे येत आहे.