शेतरस्त्यासाठी शेतकऱ्याचे खामगावच्या उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात जाण्यासाठी शेतरस्ता नाही. शेतरस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कंचनपूर येथील शेतकरी समाधान लक्ष्मण ढोरे आज, २६ ऑगस्ट पासून उपोषणाला बसले आहेत. ढोरे यांच्या कंचनपूर शिवारात असलेल्या शेतात जाण्यासाठी पूर्वी नाल्यातून रस्ता होता. मात्र पाणलोट क्षेत्राच्या कामात बंधारा करण्यात आल्याने …
Aug 26, 2021, 20:57 IST
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शेतात जाण्यासाठी शेतरस्ता नाही. शेतरस्ता खुला करून द्यावा या मागणीसाठी शेतकऱ्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. खामगावच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कंचनपूर येथील शेतकरी समाधान लक्ष्मण ढोरे आज, २६ ऑगस्ट पासून उपोषणाला बसले आहेत. ढोरे यांच्या कंचनपूर शिवारात असलेल्या शेतात जाण्यासाठी पूर्वी नाल्यातून रस्ता होता. मात्र पाणलोट क्षेत्राच्या कामात बंधारा करण्यात आल्याने त्यांना रस्ता नाही. याची तक्रार त्यांनी तहसीलदारांकडे केली होती. मात्र अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे.